history of sangli

history of sangli district सांगली बदल हे माहित आहे का ?

सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा उत्तर व ईशान्येला सोलापूर पूर्वीला विजापूर दक्षिणेला बेळगाव आणि नैऋत्येला कोल्हापूर आणि जिल्ह्याच्या पश्चिमेला रत्नागिरी हा जिल्हा आहे

जिल्ह्याचे क्षेत्रफळ :
सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळे 8572 चौरस किलोमीटर इतके आहे म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.80% इतके आहे
जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी ही 205 किलोमीटर तर उत्तर दक्षिण लांबी 96 किलोमीटर आहे

जिल्ह्याची लोकसंख्या :
जिल्ह्यातील लोकसंख्या ही २०११ च्या जनगणनेनुसार 28 लाख 20 हजार 575 इतकी आहे आणि घनता 328 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या 24 टक्के वाटा हा शहरी लोकसंख्येचा आहे
सांगली जिल्ह्याचा साक्षरता दर हा 82.62 टक्के
सांगली जिल्ह्याचा आरटीओ कोड MH 10 हा आहे आणि
सांगली जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या सुद्धा 10 आहे

सांगली जिल्ह्यातील तालुके :
मिरज, आटपाडी, पलूस, खानापूर, शिराळा , तासगाव , जत, कवठेमहांकाळ ,कडेगाव, वाळवा

जिल्ह्यात आढळणारी विविधता :
जिल्ह्यात जागोजागी भिन्न भिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती पाहायला मिळते. जत ,आटपाडी, कवठेमंकाळ हे दुष्काळी तालुके आहेत तर पलूस, वाळवा, मिरज या तालुक्यातील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो शिराळा कडेगाव कानपूर हे डोंगरी तालुके आहेत आणि एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे .हा पश्चिमेकडील शिराळा तालुका हा सह्याद्रीचे मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग दोनराळ आहे कृष्णा खोऱ्याचा परिसर मात्र मैदानी स्वरूपाचा आहे

जिल्ह्याची भाषा :
संपूर्ण सांगली जिल्हा हा मराठी भाषेचा वापर करतो परंतु कर्नाटक सीमेवरील काही गावे मराठी बरोबर कानडी भाषेचा प्रयोग करतात.
शाळेमध्ये मराठी बरोबर हिंदी , इंग्रजी शिकवत आल्यामुळे सांगलीकराना हिंदी, इंग्रजी बोलता व वाचता येतात.

You cannot copy content of this page