पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
गेल्या चार शतकापासून लाखो वाटसरूंना सावली देणारा भोसे (ता. मिरज) यल्लमा मंदिरासमोरील वटवृक्ष यंदाच्या मान्सूनमध्ये आडवा झाला.
महामार्गाच्या कामात मुळे कमकुवत झाल्याने आणि सततचा पाउस यामुळे या वटवृक्षाने अखेर आडवा झाला..
या वृक्षाला वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले होते त यामुळे महामार्गाचे आरेखन बदलण्यात आले होते.
मिरज पंढरपूर महामार्गालगत असलेल्या भोसे येथील यल्लमा मंदिरासमोर गेली चार शतके हा वटवृक्ष वाटसरू, वारकरी यांना सावली देत आहे. कोट्यावधी किटक,पक्षी यांचे आश्रयस्थान असलेला हा वटवृक्ष महामार्गात येत असल्याने त्याच्या मृत्यूची घंटा वाजत होती. मात्र, या वटवृक्षाला वाचविण्यासाठी वनराई संस्था व पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत तत्कालिन पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी केंद्रिय मंत्री गडकरी यांना विनंती केली होती. या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्याचे आरेखन बदलून वटवृक्षाला खेटून महामार्ग तयार करण्यात आला.
महामार्गाच्या कामादरम्यान वृक्षाच्या मुळांना गंभीर इजा पोहोचली असावी यामुळे हा वृक्ष कोसळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने मुळे कमकुवत झालेला हा वटवृक्ष स्वत।च्याच भाराने कोसळला असावा अशी ग्रामस्थांची धारणा आहे.
हा वटवृक्ष अजूनही वाचवता येऊ शकता का?
सांगली जिल्ह्यातील 400 वर्षे जुन्या वडाचं झाड कोसळल्यानंतर त्याचं संवर्धन कसं करता येईल, हे झाड कसं वाचवता येईल त्यासाठी कोणकोणते पर्याय वापरता येतील
500 मीटरच्या प्रचंड विस्तारामुळे हे झाड हजारो पक्ष्यांचे आश्रयस्थान होतं. मात्र त्याच बरोबर या झाडाला मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील होतं. दरवर्षी मिरजमार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हे झाड म्हणजे एक मायेची सावली होतं.साहजिकच जेव्हा महामार्गाच्या निर्मितीसाठी हे झाड तोडण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते परिवहन विभागानं घेतला तेव्हा त्या विरोधात आंदोलन उभं राहिलं होतं.
पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि वारकऱ्यांनी हे झाड तोडलं जाऊ नये यासाठी साद घातली होती. त्यामुळे महामार्ग वळवून हे झाड वाचवलं गेलं होतं.
या वटवृक्षाशी असलेल्या भावनिक नात्यांमुळे अनेक जणांनी असं वाटतं की झाड वाचवण्याच्या पर्यायांची चाचपणी करण्यात यावी.
झाड वाचवता येईल का ?
“पहिला पर्याय म्हणजे तुम्ही त्या झाडाला पुन्हा उभे करा आणि त्याला आधार द्या. झाडाच्या मुळांना पुन्हा तग धरू द्या.
झाडाच्या भोवती ओल्या मातीचा आधार द्या’
झाड सरळ उभं करून झाडाच्या भोवती ओल्या मातीचा आधार देणे हा पण एक पर्याय असू शकतो असं वल्सन सांगतात.
प्रशासन काय करणार आहे ?
दरम्यान, या झाडाच्या फांद्यांचे रोप तयार करुन ते वाटले जाणार असल्याचे सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ति धोंडमिसे यांनी सांगितले आहे.
धोंडमिसे म्हणाल्या “आता या झाडाच्या ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 700 गावात, फांद्या तोडून त्याचे रोप तयार करून प्रत्येक गावात लावले जाणार आहेत,
अधिक वाचा
सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, देवस्थाने जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अशा अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजशी जोडले जा.
Follow On Instagram
https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag
Subscribe Our Youtube Channel
https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd
Check Official Website Of Thinksanglikar for all Sangli District Info ,Blogs
https://thinksanglikar.in/
Follow On Facebook Profile
https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL
Follow On facebook Page
https://www.facebook.com/thinksanglikar
Whatsapp number
9145525222
You cannot copy content of this page