पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पैलवान म्हणजे गावातला हिरो असायचा आणि
हिंदकेसरी मारुती माने म्हणजे सुपरस्टारच.
प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेच्या ताकदीची साक्ष दिली जायची. पारावर बसलेलं काटकुळ म्हातार पण मारुतीभाऊन विष्णू सावर्डेला घुटना मारून कसं चीतपट केलं होत याच साग्रसंगीत वर्णन करून दाखवायच. ऐकणाऱ्यांची छातीसुद्धा फुगून पैलवान व्हायची.एकूण काय तर लोकांच मारुती मानेवर जीवापाड प्रेम होत.
गोष्ट आहे, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली.
आजच्यासारखी प्रसारमाध्यमे तेव्हा फोफावलेली नव्हती. अशा काळात सांगली शहरानजीकच्या कवठेपिरान या अस्सल खेडेगावातील मारुती माने या युवकाने कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावला आणि तो महाराष्ट्रात टारझन व रॉबिनहूडसारखा दंतकथेचा विषय बनला. त्यांचा जन्म २७ डिसेंबर रोजी सांगली जवळच्या कवठेपिरान (ता. मिरज) या छोट्याशा गावात झाला. त्या काळात रेडिओ व वृत्तपत्रे ही दोनच बातम्यांची माध्यमे होती. वृत्तपत्रांच्या छपाईत आजच्यासारखी आधुनिकता नव्हती. एखाद्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यासाठी त्या छायाचित्रावरून ब्लॉक बनवावा लागत असे.मारुती माने अल्पावधीत देशातील कानाकोपऱ्यात पोहोचले. प्रत्येक मराठी माणसाची मान ताठ व्हावी, असा पराक्रम त्यांनी केला होता. मारुती माने ‘हिंदकेसरी’ झाल्यानंतर पाच ते दहा वर्षे ग्रामीण व निमशहरी भागात पहिलवान बनण्याची लाटच आली होती. एखाद्या गावी ते गेले, तर त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. कोणालाही हेवा वाटेल, असे वलय मारुती माने या नावाभोवती निर्माण झाले होते. खेडेगावात एखादा तरुण मुलगा तालमीत जाऊ लागल्यानंतर दोन-चार महिन्यांनी छाती पुढे काढून चालू लागत असे. त्यावेळी गावातील बुजुर्ग त्याला बोलावून ‘मारुती माने लागून गेलास काय लेका’ असे म्हणायचे. कारण या दंतकथेला शोभेल अशी शरीरयष्टी मारुती माने यांनी संपादन केली होती.बलदंड देह आणि भरपूर उंची अशा व्यक्तिमत्त्वाचे मारुती माने त्या काळातील पहिलवानांचे आदर्श बनले नसते तरच नवल! क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रात महाराष्ट्राची ध्वजा फडकविणाऱ्या अनेक मंडळींमध्ये मारुती माने यांचा समावेश केला गेला पाहिजे. मारुती माने मल्ल म्हणून जेवढे श्रेष्ठ होते, तेवढेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते.
सहा फूट दोन इंच उंची, वर्ण गोरा व सुमारे ११० किलो वजनाची भरदार शरीरयष्टी लाभल्याने मारुती माने यांना ‘वज्रदेही मल्ल’ म्हणून ओळखले जायचे. महाराष्ट्रात अनेक दिग्गज मल्ल लाल मातीतील कुस्तीत इतिहास रचत असताना मारुती माने यांनी तत्कालीन बहुतांशी मल्लांना अस्मान दाखवून या इतिहासात आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले. पश्चिम महाराष्ट्रातील गल्लीबोळात तेव्हा शड्डूचे आवाज घुमायचे. कमरेला लुंगी व अंगात झब्बा घालून मल्लांचे तांडेच्या तांडे गावोगावी दिसायचे.
कुस्ती क्षेत्रात मिळवलेले यश –
सुवर्णपदक- अखिल भारतीय स्पर्धा-(ओरिसा)- 1965
सुवर्णपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- जकार्ता- 1962
रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- जकार्ता- 1962
रौप्यपदक- जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धा- रशिया- 1963
हिंदकेसरी- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा- (पंजाब)- 1964
सुवर्णपदक- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा- दिल्ली- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. भीमसेन (सेनादल)- दिल्ली- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. महम्मद हनिफ- कोल्हापूर- 1964
विजेतेपद- विरुद्ध पै. विष्णू सावर्डेकर- कोल्हापूर- 1965
विजेतेपद- विरुद्ध पै. चंदगीराम (हरियाना) – बेळगाव – 1966
रौप्यपदक- विरुद्ध पै. अलेक्झांडर मिद्विद् (रशिया)- 1967
रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा- (स्कॉटलॅंड)- 1969
विजेतेपद- विरुद्ध पै. सादिक (पंजाबी)- कोल्हापूर- 1970
विजेतेपद- विरुद्ध पै. दत्ता सिंग- कोल्हापूर- 1972
राजकीय कारकीर्द
कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच
सांगली जि. प.चे सदस्य – १९६० – १९७२
राज्यसभा खासदार – १९८५ – १९८६
पुरस्कार
ध्यानचंद पुरस्कार
You cannot copy content of this page