पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
जंगल ट्रेक, डोंगरदर्या मधील ट्रेक वेगळे असतात, त्यात वेगळेच थ्रिल असते. वळणावळणाच्या वाटा, डोंगर दर्या जाणकार सांगतील तसे केले तर त्यासारखी अफलातून मजा नाही सांगली जिल्हय़ात छोटी मोठी बरीच पर्यटन ठिकाणं आहेत त्यामधील “सिद्धेवाडी लेक/धबधबा” सांगलीतून अवघ्या तासाच्या अंतरावर हा धबधबा आहे.प्रचंड मोठा परिसर अगदी पायी फिरल्यासारखा आहे फक्त तेवढी चालायची तयारी हवी. वाटेत छोटे मोठे अनेक डोंगर आहेत जिथे एका पेक्षा एक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पावसाळा असल्याने विविध रंगी विविध ढंगी कितीतरी फुले बघायला मिळतील, वाटेत खाण्यासाठी वडापाव, भजी ,उकडलेली कणसे या पलीकडे दूसरे काहीही मिळत नाही.सांगलीतून तासगावमध्ये पोहोचल्यावर आरवडे मार्गे सिद्धेवाडीला जावे लागते .बिरणवाडी म्हणून एक गाव लागते तिथून आत एक रस्ता जातो तो सरळधबधब्याकडे जातो. रस्ता अतिशय सुंदर, हिरवागार असल्याने प्रवासाचा अजिबात कंटाळा येत नाही मात्र तिथे कुठेही बोर्ड लावले नसल्याने ठिकाण शोधणे थोडे कठीण जाते. गूगलमॅप वर बघून गेलेले केव्हाही चांगले…शेवटी पोहोचल्यावर कोणतेही ठोकताळे न लावता धबधबा शोधून काढावा लागतो हे सापडले की झाले. प्रचंड मोठा परिसर असल्याने बरेच चालावे लागते, शिवाय जमीन कमी पाणीच पाणी जास्त असल्याने त्या दृष्टिने तयारी करून जावे.
सुरुवातीला सिद्धेवाडी तलाव दिसतो, पुढे जाऊ तसे अनेक छोटे मोठे नैसर्गिक धबधबे बघायला मिळतात बाकी निसर्गदत्त सौंदर्य लाभले हे मात्र नाकारता येणार नाही शिवाय सांगलीत अगदी जवळच असा धबधबा असल्याने कुठेही लांब जावे लागत नाही, अगदी एकदिवसीय सहल करण्यासाठी ठीक आहे
“सिद्धेवाडी लेक/धबधबा”.
You cannot copy content of this page