Durga Mata Daud sangli

दौड म्हंटल की सांगली !

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या… असं फक्त म्हणायचे नसते हो, त्यासाठी मागणं मागावं लागतय आई अंबाबाईला,
ते मागण मागायला देवीच्या चरणी जाणं म्हणजेच श्री.दुर्गामाता दौड

श्री दुर्गा माता दौडीचे ऐतिहासिक कारण
राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक जिजाऊ माता भोसले व श्री शहाजीराजे भोसले हे दोघेही श्री दुर्गा मातेचे भक्त होते. शहाजीराजांचे जीवन ते अग्निमय ,रक्तमय व युद्धमय होते अशा शहाजीराजांशीच्या जिजामातेने संसार केला व शिवछत्रपतींना घडवले की जिजामाता आपल्या सर्वांसाठी श्री दुर्गामातेप्रमाणे आदर्शवत आहे. शहाजीराजांनी दोन वेळा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न, केला दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही त्यांची अपूर्ण राहिलेले स्वप्न जिजामातेने श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांकडून हिंदवी स्वराज्य स्थापन पूर्ण केले .शिवछत्रपतींच्या जन्माआधी देशावर पारतंत्राच्या अंधकार अती दाट होत चालला होता .परंतु हिंदू शूद्र होऊन ते लाचार जीवन पत्करत होता अशावेळी अशा सातशे वर्षाच्या पारतंत्र्यात असलेला भीषण काळ्या रात्री श्री शिवनेरीवर श्री शिवछत्रपतींच्या रूपाने पुण्यश्लोक जिजाऊंच्या पोटी जन्माला आले. अशा अन्याही अत्याचारी काळात शिवबा पोटी असतानाही पडती वर्षाप्रमाणे जिजामातेने नवरात्रीत घट बसवले पण त्यांनी काय मागितले, तर आपला संसारासाठी नव्हे तर, भोसले घराण्यासाठी नवे, तर कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बोलुचिस्तान पसरलेला भारत मातेचा उध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद दे, हे मागणं स्वतःसाठी नसून हिंदू समाजासाठी होते तेच हिंदवी स्वराज्याची कार्य आपल्या हातून अखंडितपणे पार पडावे यासाठी समस्त हिंदू बांधवांनी दुर्गा मातेचे दौडीच्या माध्यमातून मागणी मागावे जाण्याचा कार्यक्रम म्हणजेच श्री दुर्गा माता दौड. होईल त्याचप्रमाणे धर्मासाठी झुंजण्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या चरित्राचा आदर्श समोर ठेवण्याचा तसेच धर्मरक्षण आणि राष्ट्रप्रेम यांच्या जागृतीसाठी या साठी दौडीचे आयोजन आहे

durga mata daud , bhide guriji

श्री दुर्गामाता दौड कशाप्रकारे व कोणी चालू केली.
नवरात्र जवळ आली ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांना वेध लागतात ते श्री दुर्गामाता दौडीचे. अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना ते विजयादशमी म्हणजे दसऱ्यापर्यंत. पहाटे उठून राष्ट्रभक्तीपर गीत म्हणत , नारे देत , महाराजांचा जयघोष करत शहरातल्या प्रत्येक वाटेने सर्व धारकरी घेऊन दौडत जायचं आणि पदर पसरून देवीकडे एक मागणं मागायचं, भारत मातेचा उध्वस्त झालेला संसार पूर्ववत होण्यासाठी तिचं गतवैभव पुर्नस्थापित होण्यासाठी म्हणून जी दौड करायची ,तिच नाव श्री दुर्गामाता दौड. देवीकडे मागितलेले हे मागणं म्हणजे स्वतःचा संसार आणि घरादारासाठी न मागता देशाचा उध्वस्त झालेला संसार पुर्नस्थापित होण्यासाठी मागण मागायचे असं सलग नऊ दिवस मागण मागण्याचा हा उपक्रम गेले 38 वर्षापासून श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या हजारो खेड्यापाड्यांमध्ये हा उपक्रम श्री दुर्गा माता दौड या नावेने केला जातो अलीकडच्या वर्षांमध्ये मुंबई नवी मुंबई आणि ठाणे येथे सुद्धा मोठ्या संख्येने दौड काढली जाते महाराष्ट्रातील धारकऱ्यांनी सुरू केलेले दौड पाहून देव ,देश धर्मासाठी निस्वार्थ भावाने महाराष्ट्रातच नव्हे तर राजस्थान, कर्नाटक, बेळगाव सुद्धा दौडीचे नियोजन करतो बेळगाव मधल्या श्री दुर्गामाता दगडीचे महत्त्व म्हणजे या दगडीचे नेतृत्व मुलींकडे देण्यात येत. भगवा ध्वज आणि शस्त्र घेऊन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रणरागिनी धावतात या ठिकाणी बेळगावकर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून देवीकडे मागणं मागतात

श्री दुर्गा माता दौडीचे नियोजन (सांगली )
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी 1985 साली तरुणांचे संघटन करण्याच्या उद्देशाने सांगलीत दुर्गामाता दौडीची सुरुवात केली. याचा उद्देश केवळ तरुणांचे संघटन असाही नव्हता तर नवरात्रात देवीला धावत जाऊन तिचे दर्शन घ्यायचे आणि तिची आरती करुन तरुणांमध्ये राष्ट्राप्रती लोकजागृती करणे हा उद्देशही त्यामागे होता. घटस्थापनेदिवशी पहाटे पाच वाजता सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शहरातील तरुण एकत्र येतात आणि तेथे शिवरायांना वंदन करुन ध्येयमंत्र म्हणत दौडीस सुरुवात होते
दौडीच्या अग्रभागी भला थोरला भगवा ध्वज घेऊन धारकरी धावत असतात. त्यांच्या मागे हजारोंच्या संख्येने तरुण धावत असतात. शहरातील मुख्य मार्गावरुन माधवनगर रोडवरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर दौड थांबते. तेथे दुर्गामातेची आरती करुन वंदन करण्यात येते. तेथून पुन्हा शहरातील विविध भागात दौड जाते. प्रत्येक भागात दौडीचे मोठ्या उत्साहात स्वागत होते. रांगोळी काढून, घरांवर भगवे ध्वज उभारून काही ठिकाणी फटाके उडवून दौडीचे स्वागत केले जाते. अशा उत्साही वातावरणात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दौडीची सांगता होते.. सलग नऊ दिवस ही दौड होते. दसऱ्या दिवशी दौडीची सांगता होते

You cannot copy content of this page