पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र!समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या
११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे
बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूर पासून १० कि.मी. अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे. १८८४ च्या बॉम्बे गझेटमध्ये बहे गावाचा उल्लेख दिला आहे. प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती.रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे १ कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे. या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात.त्यामध्ये या गावाचे ‘बाहे’ , ‘बाहोक्षेत्र’ , ‘बाहूक्षेत्र’ इ. नावांनी उल्लेख सापडतात.मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत, त्यावरून चालत जाता येते.मंदिराच्या तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो
रामलिंग नाव कसे पडले ?
रामलिंग बेटाचे सर्वात उंच अशा मध्यभागी श्री.रामलिंग देवालय असून ते सर्वात पुरातन आहे
प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना जाता- जाता हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिव शंकराची पूजा केली म्हणून यास रामलिंग असे म्हणतात .याचा पुरावा श्रीधर स्वामी यांनी लिहलेल्या वाल्मिकी रामायणात आहे.पूर्वी येथे छोटे मंदिर असावे हल्लीचे राममंदिर हे १४ व्या शतकात बांधले आहे .मंदिरासाठी फक्त चुना व वीट याचा वापर केला आहे.गाभारा व शिखर वैशिष्टपूर्ण नक्षीकामामुळे सुशोभित आहे.
या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आलेले नाही असा इतिहास आहे प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हेप्राचीन तीर्थक्षेत्र!समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या
११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे
रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी एका कथेचा उल्लेख सापडतो. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले. प्रभू श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन त्यांना झाले. पण हनुमान कुठे दिसेनात, तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना विचारले, “येथे मारुती का नाही?” तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले, “यवनांच्या भयास्तव मारुतीची मूर्ती आमच्या पूर्वजांनी भीमकुंडात टाकली आहे.”तेव्हा समर्थांनी हाक दिली, याविषयी समर्थांनी एका अष्टकात म्हटले आहे
हनुमंत पाहावयालागी आलो, दिसेना सखा थोर विस्मीत जालो।
तयावीण देवालये ती उदासे, जळातूनी बोभाइला दास दासे ।।त्यानंतर समर्थांनी बाहे गावातील गावकऱ्यांना ११ खंडीचा नैवेद्य तयार करावयास सांगितले व डोहात बुडी मारून मारुतीची ११ गज उंचीची सुवर्णमूर्ती वर काढली. कृष्णाजीपंत बोकील कोरेगावकर ते ही समर्थांबरोबर डोहात गेले. ते ११ प्रहर आत होते. मूर्ती पाण्यातून वर आणल्यानंतर मूर्तीला दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी ११ खंडीचा नैवेद्य तयार केला न्हवता. तेव्हा मारुतीने आज्ञा केली की, कलियुगात ही मूर्ती बाहेर राहणे धोक्याचे आहे व तिची स्थापना केल्यास लोकांत भक्तीऐवजी सुवर्णमूर्ती असल्याने मोह उत्पन्न होईल. तेव्हा तिची स्थापना करु नये. ही मूर्ती परत डोहात ठेवावी. आपल्या हाताने दुसरी मूर्ती तयार करून स्थापन करावी. तेव्हा समर्थांनी ती मूर्ती परत डोहात ठेवून चुना तयार करून तिच्यासारखी दुसरी मूर्ती तयार करून बाहे (बहे) येथील रामलिंग बेटावर मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. हा मारुती रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस आहे. यालाच भव्य मारुती किंवा विक्राळ मारुती असेही म्हणतात. ही मूर्ती भीमरूपी असून फार सुंदर आहे
You cannot copy content of this page