पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
संस्थानी खानाखुणा, सुंदर कृष्णाकाठ, नाट्य पंढरी व कलावंतांचा जिल्हा म्हणून ओळखले जाणारी सांगली. तसेच आपल्या प्रत्येक तालुक्यात असलेली भिन्न-भिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती. त्या मुले सांगली सहसा सोडावी असेच कुणाला वाटत नाही. जर तुम्ही सांगलीकर असाल किंवा सांगली फिरायची असेल तर सांगली जिल्ह्यातली काही पर्यटन स्थळे जिथे तुम्ही आपल्या परिवारासोबत किंवा आपल्या मित्रांन सोबत नक्की भेट देऊ शकता.
गुढे पाचगणी :-
‘मिनी महाबळेश्वर’ असे म्हणले जाणारे, म्हंजे थोडक्यात स्वर्गच म्हणा. पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटक या भागात भटकंती करतात.
. हिरवळरूपी शालीला रंगीबेरंगी, विविध जातीची रानफुले व गवतफुलांची झालर,. हिरवीगार भातशेती, मंद वाहणारा वारा, डोंगरमाथ्यावर घोंघावत असलेल्या पवनचक्क्या,हे सारं सृष्टीचं सौंदर्य पाहून पर्यटक सुखावत आहेत. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे परिसरातील हिरवीगार वनराई बहरून येते, डोंगररांगामधून पसरलेले विस्तीर्ण पठार, हिरव्यागर्द डोंगर-कपारीतून छोटे मोठे धबधबे पर्यटकांना खुणावत . श्रावणातील वातावरणात परिसर भुरळ घालत असून नजर फिरेल तिकडे हिरवाईने नटलेले विलोभनीय दृश्य पाहताना या परिसरातील हिरव्यागार सृष्टीचं सौंदर्य आणखीच खुलून दिसते. गुढे पाचगणी पठारावर जाताना रांजणवाडी, सावंतवाडी, भाष्टेवाडी, येसलेवाडी येथील घाटातून प्रवास करताना असलेली नागमोडी वळणे व या घाटाचे निसर्गसंपन्न वैभव, हिरवीगार दृश्यं डोळयांना भुरळ पाडते .त्या रस्त्यावरून जाताना मनात एकच भवन येते जर स्वर्गाकडे जाणारा कोणता रस्ता असावा तर तो ह्या पेक्षा काही वेगळा नसावा !
चांदोली धरण :-
चांदोली गावाच्या हद्दीवर असल्याने चांदोली,तर वारणा नदीवर असल्याने वारणा म्हणून हे धरण प्रसिध्द आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव चटकन डोळ्या पुढे येते.सुमारे ३४ टी एम.सी.पाणीसाठा असलेले व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेले हे धरण निर्मिती पासूनच चर्चेत राहिले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावली आहे.शिराळा तालुक्याच्या हद्दीत अभयारण्यात असलेल्या प्रचीतगडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन नद्या धरणाच्या पाणीसाठयाचे मुख्य स्त्रोत आहेत.येथे १९९८-९९पासून ८ मेगावॉट क्षमतेची दोन जनित्रे एकूण १६ मेगावॉट वीजनिर्मिती करीत आहेत धरणाच्या प्रवेशद्वारावर; तसेच माथ्यावर दक्षिण व उत्तरेला सुरक्षेसाठी दोन चौक्या आहेत.परवानगी घेऊनच धरण पाहण्यासाठी सोडले जाते. दुचाकी,चारचाकी घेऊन धरणाच्या सर्व भागात आरामदायी फिरता येते डोंगर, दर्या,प्रचंड पाणीसाठा, थंड हवा, शांत व नयनरम्य परिसर पाहून कोणालाही येथे मुक्काम जणू भुरळच पडते.उन्हाळ्याअ येथे येणार्या पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा आहे. वन विभागामार्फत पाणलोट क्षेत्रात चारही बाजूंनी पाणी असलेल्या टेकडीवर तंबू टाकण्यात येत. तेथे राहण्याची सोय जेवणाची सोय होती
चांदोली राष्ट्रीय उद्यान :-
सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे. ३१७.६७ किमी २ क्षेत्र असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये येते.वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. वन्य प्राण्यांच्या गणनेत, चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांसह २५ बिबट्यांचा वावर असल्याचे ठशांवरून निदर्शनास आले आहे, तर ३५० ते ४०० च्या दरम्यान गवे, २५० ते ३०० च्या दरम्यान सांबरे, १०० अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत, तर भेकर, रानडुक्कर सर्वत्र आढळतात. सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येत आहे. चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणि अडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.
रामलिंग बेट-बहे :-
प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र ! समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे
बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूर पासून 10 कि.मी. अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे. 1884 च्या बॉम्बे गझेटमध्ये बहे गावाचा उल्लेख दिला आहे. प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती. रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे 1 कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे. या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात. त्यामध्ये या गावाचे ‘बाहे’, ‘बाहोक्षेत्र’, ‘बाहूक्षेत्र’ इ. नावांनी उल्लेख सापडतात. मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत, त्यावरुन चालत जाता येते. मंदिराच्या तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो
दंडोबा :-
दंडोबा हिलस्टेशन सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दंडोबाच्या डोंगरावर आहे. तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेला दंडोबा डोंगर हे रमणीय ठिकाण आहे. पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे 1150 हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर पुरातन दंडनाथाचं मंदिर असून; सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे
डोंगरमाथ्यावरचे शिखर आश्चर्यकारक आहे. इथले पुजारी आणि देवस्थानच्या मते हे शिखर मंदिराचं आहे. याची रचना पहिली तर हे लक्षात येतं, की त्याचा उपयोग वॉच टॉवर म्हणूनही करता यावा. हे शिखर पाच माजली असून; सर्वांत वरचा भाग आहे तिथं चार ते पाच माणसं उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढं वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तिथं एक दगड आहे ज्याचा उपयोग करून वरती जाता येतं
वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतोढग स्वच्छ असतील वातावरण चांगलं असेल तर इथं उभं राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचं शिखर दिसतं, असं इथले ग्रामस्थ सांगतात.
किल्ले मच्छिंद्रगड :-
हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. 1676 च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गश्रृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता हा किल्ला. कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली, पुढे इ.स. 1693 मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी या गडाचा किल्लेदार होता देवीसिंग. 12 नोव्हेंबर 1693 रोजी औरंगजेब तख्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला, तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला, त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:
मच्छिंद्रगड गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट केलेली असून या वाटेने साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. येथून एक पायवाट आपल्याला गडाच्या दक्षिण भागात असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडे घेऊन जाते. मंदिर प्रशस्त असून विविध शिल्पांनी सजविलेले आहे. येथे भाविकांचा नेहमी राबता असतो. येथून देवळाच्या पिछाडीस एक मोठी कोरडी विहीर आहे, नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात. मच्छिन्द्रगडाचा माथ्याचा आकार आटोपशीर असल्यामुळे गडफेरी साधारण तासाभरात पूर्ण होते, गडावर जुने अवशेष तसे फार कमी असून तटबंदीसुद्धा आता जुजबी स्वरुपत उरलेली आहे
सागरेश्वर अभियारण्य :-
१०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे. कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत. सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे. सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.
सांगली ही आपली आहे आणि ती स्वच्छ ही ठेवणे ही आपली जबाबदारी आहे .एखाद्या ठिकाणी भेट देत असाल तर कचरा करू नका, प्लास्टिक ,पाणी बॉटल इतर गोष्टी कचरा कुंडीत टाका.
सांगलीतल काही पर्यटन स्थळे असतील जी लोकांना माहित नाहीत तर अशी आम्हला कळवा, आम्ही सर्वांन पर्यंत पोहचवू .
सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल वर इन्स्टा पेजला फॉलो करा.
Follow On Instagram
https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag
Subscribe Our Youtube Channel
https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd
Check Official Website Of Thinksanglikar for all sangli district info , blogs
https://thinksanglikar.in/
Follow On Facebook Profile
https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL
Follow On facebook Page
https://www.facebook.com/thinksanglikar
Whatsapp number
9145525222
सोर्स : गूगल ,विकिपीडिया ,माय सांगली ,चांदोली रिसॉट
You cannot copy content of this page