bhavai ustav ashta

श्री चौंडेश्वरीदेवी भावई उत्सव

आष्टा शहराच्या केंद्रस्थानी आधा शहराच्या कद्रस्थ शैलीतील देवीचे मंदिर आहे. मंदिरात चौंडेश्वरी तथा अंबाबाईदेवीची अष्टभूजायुक्त महिषासुरमर्दिनी रुपातील अखंड पाषाणामधील स्वयंभू मूर्ती आहे. भावई उत्सव शाक्त सांप्रदायिक खेळ आहे. मूळचा तो कर्नाटकातील बदामी गावचा. तेथे बंद होऊन आष्टा येथे तो साजरा केला जात आहे. अशी कथा रूढ आहे की, १३१६ मध्ये थोरात सरकार यांना कर्नाटकातील बदामी लुटीत एक पेटी मिळाली. पेटीचे दार उघडले. त्यावेळी आश्चर्य वाटावी अशी घटना घडली. पेटीतील मुखवटा उडून गेला. देवीचे दागिने, मुखवटे, तलवारी मिळाल्या. पेटीतील मुखवट्याप्रमाणे दुसरा मुखवटा तयार करून तीन ताम्रपटातील माहितीवरूनबारा बलुतेदारांनी उत्सव येथे सुरू केला. पूर्वी या परिसरात चंड-मुंड राक्षस त्रास देत. त्यांच्या वधासाठी देवीने चामुंडा, चंडिका अवतार घेऊन दैत्याचा वध केला. जनतेची त्रासातून सुटका झाली. त्यासाठी देवीने विविध रुपे धारण करून दैत्याचा शोध घेतला. असा खेळ भावई उत्सव म्हणून साजरा होतो. भावई उत्सवातील वाद्यसंगीत भारतवर्षात प्रसिद्ध आहे.

bhavai ustav ashta


सर्व मानकरी, बारा बलुतेदार मिळून हा उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करतात. दमामे, गुरव, कुंभार, नाभिक, परीट, सरडे, चर्मकार, जंगम, तराळ, महात असे खेळगडी, तर सुतार याच्याकडे मुखवटे (आरगडी) खेळाची कामे आहेत.
खेळ सुरू होण्यापूर्वी महिनाभर मंदिरात रणवाद्य सुरू असते. ज्येष्ठ वद्य दशमीपासून ‘दिवा निघणे’ विधीने खेळाला सुरुवात होते. भावकाई मंदिरासमोरील कौरव-पांडवकालीन दगडाखाली दिवा पुरला जातो. जुन्या अंगाऱ्यावरून आगामी वर्षाचे भाकीत केले जाते.
दुसऱ्या दिवशी खेळगड्यांना घोंगडी, लोकरीचे कंकण बांधले जाते. अठरापगड जातीत भेदभाव राहत नाही. दैत्यरुपी पिशाच्यांचा शोध घेण्यासाठी काळे कपडे परिधान करून आळुमुळू फेरी निघते. पाच पिसे सैनिक सेनापती म्हणून दैत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. ज्येष्ठ अमावस्येदिवशी देवी स्वतः सैनिकासह दैत्याच्या शोधासाठी जोगण्यांच्या रुपात बाहेर पडते.
हरिजनांचा थळ पांढरीजवळ पूजेचा मान आहे. यावरून शेकडो वर्षांपासून अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू असल्याचा संदेश मिळतो. भदजोगणी, गावजोगणी, दोन मुखवटे अशा जोगण्या असतात.


ज्येष्ठ अमावस्येदिवशी देवीचे दोन मुखवटे व आरगडी म्हणजेच देवी व दैत्याचे मुखवट्याच्या धारेने युद्ध रंगते. रणशिंग, सुंबळ, चौंडके, पोवा, कैताळ, नगारे अशा वाद्यांच्या विशिष्ट लयीत शहर दणाणून निघते. धावा, रण पाहण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी होते.
मारुती मंदिराजवळ मुखवटे दैत्याला ओलांडून जातात. ‘देवीने अवतार घेऊन दैत्याला डाव्या पायाच्या अंगठ्याखाली रगडून मारले. प्रजेचे कल्याण झाले,’ अशा अर्थाची गाणी म्हटली जातात. ‘पाखरे’ हा आनंदोत्सवाचा खेळ खेळला जातो. ‘सती’, ‘चोराची बाणी’, ‘चिटक्या-मिटक्या’ असे कार्यक्रम होतात. आषाढी पोवा, कैताळ, नगारे अशा वाद्यांच्या विशिष्ट लयीत शहर दणाणते. ‘धावा’, ‘रण’ पाहण्यास भाविक गर्दी करतात. एकादशी दिवशी चौंडेश्वरी मंदिरात खेळाची सांगता होते.

शाक्त सांप्रदायिक खेळ
भावई उत्सव शाक्त सांप्रदायिक खेळ आहे. सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारा हा उत्सव शहराचे वैभव आहे. सव्वालाखी व भावईचे आष्टा म्हणून शहराचा सर्वदूर लौकिक आहे. उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक उत्सव तितक्याच श्रद्धेने साजरा केला आहे. तरुणांचा वाढता उत्साह, खेळगड्यांजवळ केली जाणारी गर्दी, यामुळे भाविकांना सर्व खेळ नीट पाहायला मिळत नाहीत. भावई उत्सवातील खेळ, परंपरा, पावित्र्य जसेच्या तसे जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

bhavai ustav ashta

अनेक वर्षांची परंपरा असलेला, महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध भावई उत्सव आजही तितक्याच भक्तिमय, उत्साही वातावरणात सव्वालाखी आष्टा शहरात साजरा केला जातो. प्रभू रामचंद्रांनी अष्टलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. त्यावरून गावाला आष्टा नाव प्राप्त झाल्याचा इतिहास आहे. या गावी प्राचीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक उत्सव म्हणून भावई उत्सवाची परंपरा आहे.

सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, देवस्थाने जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अशा अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजशी जोडले जा.

Follow On Instagram
https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag

Subscribe Our Youtube Channel
https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd

Check Official Website Of Thinksanglikar for all Sangli District Info ,Blogs
https://thinksanglikar.in/

Follow On Facebook Profile
https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL

Follow On facebook Page
https://www.facebook.com/thinksanglikar

Whatsapp number
9145525222

You cannot copy content of this page