चंदू-चॅम्पियन'

सांगलीच्या मातीत घडलेल्या जिगरबाज माणसाची कहाणी – ‘चंदू चॅम्पियन’

कोण आहेत रिअल ‘चंदू चॅम्पियन’

पाकिस्तान विरुद्ध लढताना जखमी ,१८ महिने कोमात ते पॅरालिम्पिक मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर

नाव : मुरलीकांत पेटकर
जन्मतारीख : १ नोव्हेंबर १९४४
जन्मस्थान : पेठ नाका ( इस्लामपूर ), ता. वाळवा, जि. सांगली
क्षेत्र : बॉक्सिंग,पोहणे, भालाफेक, टेबल टेनिस ,शॉट पुट, , स्लॅलम पदक : पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पुरस्कार : पद्मश्री, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार


बालपण : पेटकरांचा जन्म हा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला . त्यांच्या वडिलांनीचे इस्लामपूर येथे छोटे टेलरिंग चे दुकानं होते. त्यांना लहान पणापासूनच विहिरीत पाहण्याची आवड होती. शाळेत जायचे त्या वाटेत एक कुस्तीचा आखाडा होता. पैलवानांना मदत करून त्यांना ऐका दिवशी थंडाईचा ग्लास मिळाला, परिस्थिती गरीब असल्यामुळे त्या ग्लासच्यानादात ते रोज आखाड्यात जावून पैलवानांची थंडाई बनवून द्यायचे त्याबद्दल त्यांना प्रत्येक पैलवानाकडून एक एक ग्लास थंडाई व दूध मिळायचे. ते पचवण्यासाठी त्यांनी तालमीत व्यायाम सुरू केला . शाळा ते तालीम ,तालीम ते घर असा दिनक्रम चालू होता . एके दिवशी कमेरी गावची जत्रा होते पेटकर सुध्या गेले तिथे त्यांनी कुस्ती खेळली आणि त्यात जीवनातील पहिले बक्षीस एक पैसा जिंकले . नंतर कमेरीच्या सरपंचाच्या मुलागा कुस्ती साठी उठला, सरपंचाचा मुलगा असल्यामुळे कोण उठेना, पेटकर उठले आणि कुस्ती चालू झाली, जसे जसे राऊंड वाडत होते तसे बक्षिसाची रक्कम वाडत गेली. शेवटी आकाराव्या राऊंडला ते जिंकले आणि सरपंचाच्या पोराला पाडल्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्या जीवावर उठले . ऐका पैलवानाने ते जिंकलेले पैसे गोळा केले व पेटकराना गाडीवर बसवले आणि हायवेला आणून एक ट्रक थांबवून त्यात बसवले आणि सगळ त्या ड्राइव्हवर ला सांगितले व पैसे दिले , त्यांची आत्या पुण्यात होती येवढं माहित असल्यामुळे ते पुण्यातील एका धोबी घाटावर सोडले. शंकर-शेट रोडला आवा म्हणून एक जण होत्या त्यांनी पेटकरना सांभाळले . व ते तिथेच राहून शाळेला जावू लागले. त्यावेळेस पेटकर हे दहा-अकरा वर्षाचे होत. ऐकट पुण्यात घरी कोणतीच कल्पना नाही , ते कुठं आहेत ,काय झालंय त्यांचं सोबत. असे होत पेटकरांचे बालपण.

धोबीघाट ते बॉइज बटालियनचा प्रवास :
सात आठ महिने झाले असता असच रस्त्यावर जाताना त्यांना आत्या भेटली हा . त्यांनी त्या बाईंना , ‘ माझ्या भावाचा मुलगा आहे मी त्याला घेऊन जातो ‘ , त्याला त्याच्या घरी किंवा माझ्याकडं ठेवते असं सांगून पेटकराना आपल्या सोबत घेऊन गेल्या . आत्याचा नवऱ्याला जबाबदारी नको म्हणून त्याने ऐका पेपर मधली आर्मीची बॉईज बटालियनची जाहिरात वाचली , आणि त्यांना भरती केले. पुण्याच्या रिक्रुटमेंट ऑफिस भरती केले ,पण पण पेटकरांना कोणतीच कल्पना नव्हती की आपण सैन्यात जातोय . तिथून तेंची बेंगळुरूला रवानगी झाली . तिथे ते हॉकी खेळत पण मराठी असल्यामुळे त्यांचे सिलेक्शन होत नव्हते. म्हणून ते एका झाडाखाली जाऊन रडत बसले त्यांचे एक इन्स्ट्रक्टर आले आणि त्यांनी त्याला बोलले “अरे पेटकर बच्चे क्या रो रहा है ? ऐ रोना लडकी का काम है ! सिलेक्शन नही हुआ तो छोड दो हॉकी और कलसे बॉक्सिंग चालू कर दो ! ” नंतर त्यांनी बॉक्सिंग चालू केली . व बॉक्सिंगसाठी ते सदान कॅमांड ते सर्व्हिस टीम आणि नंतर त्यांचे जपान साठी सीलेक्शन झाले. त्या वेळेस ते सातारा अठरा वर्षाचे होते. दहा पंधरा देशान विरुद्ध नॉकआउट खेळत गेले. पण युगांडा विरुद्धच्या फाईट मध्ये ते स्वतः नॉकआउट झाले व दोन दिवस बेशुद्ध होते.( त्यांचे तेलंगणा मधे छोटू टायगर हे टोपण नाव पडलेलं होत .)

काश्मीर बघण्याची इच्छा : जपान मधील कामगिरी नंतर ते जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यावेळेस त्यांची ट्रेनिंग पूर्ण झाले असून ते सध्या शिपाई या पदावर कार्यरत होते.त्यांच्या सिनिअरनी विचारले की तू एवढं रेकॉर्ड केलास, तुला काय बक्षीस पाहिजे, पैसे पाहिजे , काय बघायचं हाय काय , त्यावर मुरलीकांतानी काश्मीर बघण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांना काश्मीरमध्ये पोस्टिंग मिळाली . स्पोर्ट्समन असल्यामुळे त्यांची कामगिरी बघून आर्मीची जीप कुठे पेट्रोलिंगला चालली कि चालली की त्यांना बसून त्यांना फिरायला पाठवायचे , सगळे व्यवस्थित चालू होते.

आणि तो दिवस आला ,
ते म्हणतात, “1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते आणि आम्ही काश्मीरमध्ये होतो. काही वेळाने आम्हाला शिट्टीचा आवाज आला. आम्ही सगळे नवीन होतो आणि आम्हाला वाटले की कदाचित ती शिटी वाजवली गेली, हि शिट्टी म्हणजे चहाचा ब्रेक असेल पण हा हवाई हल्ल्याचा इशारा होता.” “माझ्यासोबत असलेले सैनिक बंकरमधून निघून गेले. दरम्यान, हल्ला झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. मलाही गोळ्या लागल्या. एक गोळी माझ्या पाठीच्या कण्याला लागली. ती गोळी अजूनही माझ्या पाठीच्या कण्यामध्ये आहे.” गोळी लागल्यावर मी तिथल्या टेकडीवरून खाली पडलो. मी खाली पडल्यावर मागून येणारा आपल्याच आर्मीचा गाडी माझ्या अंगावरून गेली मी बेशुद्ध झालो .

या घटनेनंतर मुरलीकांत यांचे आयुष्यच बदलून गेले : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुरलीकांत यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान पेटकर यांच्या मांडीला, गालावर आणि कवटी असा एकूण नऊ गोळ्या लागल्या होत्या. दरम्यान, सैन्याची जीपसुद्धा त्यांच्या अंगावरून गेली. ते सात-आठ महिने हॉस्पिटलमध्ये कोमात होते त्यांची स्मरणशक्ती गेलेली होती एके दिवशी हॉस्पिटलमध्ये बेडची स्वछता करताना ते बेडवरून पडले त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना उचलायला आले आणि त्यांना तो दिवस आठवला ज्या दिवशी टेकडीवरून पडले.


ते म्हणतात “मला सर्व काही आठवले. मला वाटले की मी पाकिस्तानी हद्दीत पकडला गेलो आणि मी समोर बसलेल्या जनरलला गळा दाबून धरले. सैन्यात आम्हाला आधी शत्रूला मारायचे आणि मग मरायचे असे शिकवले जाते. तो म्हणत होता की आम्ही “तो आहे. एक भारतीय पण एक सैनिक असल्याने मी ते स्वीकारायला तयार नव्हतो.
“मी म्हणालो तुझा आयडी दाखव. मग मला एक नर्स दिसली. ती भारतीय लष्कराची नर्स होती. मग मी जनरलला सोडलं आणि माफी मागितली. पण त्यानंतर मला खूप मार खावा लागला पण जनरलने सगळ्यांना थांबवलं.”
या घटनेनंतर मुरलीकांत यांचे आयुष्यच बदलून गेले, त्यांना दिव्यांग घोषित करण्यात आले, पण त्यांनी हार मानली नाही.

murlikant petkar, मुरलीकांत पेटकर, चंदू चॅम्पियन

अशी झाली स्विमिंगची सुरुवात : त्यांच्या त्यांच्या मणक्यामध्ये गोळ्या उद्या दवाखान्यात सुविधा नसल्यामुळे त्यांना पुढे पुढे मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांना दिल्लीवरून मुंबईच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये 1966शिफ्ट करण्यात आले.( त्यांचा युद्धात एक डोळा गेलेला आहे गेलेला होता त्या जागी आता दुसरा नवीन डोळा बसवण्यात आला.) त्यावेळी त्यांचे वय वीस वर्ष होते. डॉक्टरांनी त्यांना सांगितले तुला जर स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल तर तू स्विमिंग कर . आणि ते तयार झाले. हॉस्पिटल पासून दीड किलोमीटर अंतरावर आर्मीचे जलतरण तलाव होते. फक्त प्रश्न हा होता की त्यांना घेऊन कोण जाणार त्यावेळेस आर्मी ची सर्विस टीम सुद्धा प्रॅक्टिस करत होती त्यांच्याशी चर्चा केली व व ती रोज मुरली कांतांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन परत हॉस्पिटल मधून आणून सोडायचे.
पहिल्यापासूनच पोहण्याची आवड, आणि मिळालेल्या नॅशनल टीम कडून चांगला गाईड त्यामुळे त्यांना आणखीनच आवड निर्माण झाली. त्याच वेळेस त्यांना समजले की भारत सरकार अपंगांसाठी काहीतरी करत आहे . त्यांनी रोटरी क्लब ते राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या.

असंच एका दिवशी विजय मर्चंट हे स्विमिंग पूल वरती होते आणि त्यांनी मुरलीकांतांना स्विमिंग करताना पाहिले आणि त्यांनी मुरलिकांतांनची भेट घेतली व विचारले आपण भारताची एक आंतरराष्ट्रीय टीम तयार करत आहे त्याचे तू भारताला रिप्रेझेंट करशील का ? आधीच असलेला खेळातील एक्सप्रेस अनुभव व इंडियन आर्मी असलेली बँकिंग त्यामुळे फायनान्शिअल काही विषय येणार नाही आहे त्या मागचे लॉजिक होते. व ते तयार झाले त्यांनी एक अट ठेवली की मला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच पाहिजेत , ते मान्य झाल आणि जावळे म्हणून त्यानं कोच लाभले ,त्यांनी चांगली तयारी करून घेतली त्या वाटेवरची थंड पाणी असेल मनून रात्री 1 वाजता 3 वाजता स्विमिंग करून घेतले. त्यांचा डाएट ची काळजी घेतली.

.murlikant petkar, मुरलीकांत पेटकर, चंदू चॅम्पियन

एक पैसा ते भारतासाठी पहिले गोल्डमेडल : जर आपण पॅरालिम्पिक खेळांबद्दल बोललो तर ते थेट युद्धाशी संबंधित आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक सैनिक जखमी झाले आणि अनेक सैनिक अपंगही झाले.त्यांच्या पुनर्वसनासाठीच खेळ सुरू झाले, ज्याने हळूहळू स्पर्धात्मक खेळांचे रूप धारण केले.1948 मध्ये जेव्हा लंडनमध्ये ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले होते, तेव्हा स्टोक मँडेविले हॉस्पिटलशी संबंधित लुडविग गुटमन यांनी व्हीलचेअर ऍथलीट्ससाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. पुढे त्याला पॅरालिम्पिक खेळाचे स्वरूप आले.

मुरलीकांत म्हणतात की खेळामुळे आनंद आणि सकारात्मकता येते तर युद्धामुळे विनाश आणि दुःख मिळते.

मुरलीकांत यांना जलतरणात आपली कारकीर्द घडवली आणि 1972 मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

जर्मनीतील हेडलबर्ग येथे झालेल्या 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये त्यांनी 37.33 सेकंद वेळेसह इतिहास रचला, भालाफेक आणि स्लॅलममध्येही ते सहभागी झाले होते. पेटकर तिन्ही स्पर्धेत अंतिम फेरीत होते.

तेल अवीव, इसायल येथे 1968 च्या पॅटालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली. या काळात टेबल टेनिसमध्ये मुरलीकांत पेटकर दुसत्या क्रमांकावर राहिला.

    मुरलीकांत यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. त्यांना सन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. 1982 मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला, पण तो नाकारण्यात आला. महाराष्ट्र शासनाने “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ” गौरवले . भारत सरकारने हि पुढे त्यांना पद्मश्री प्रदान केली.

    murlikant petkar, मुरलीकांत पेटकर, चंदू चॅम्पियन

    इतिहासात लुप्त झालेली पण प्रचंड प्रेरणादायी, संघर्षातून इतिहास निर्माण केल्याची ही धेर्यकथा अनुभवण्यासारखी नक्कीच आहे.
    सर तुमच्या कार्याला सलाम…

    अधिक वाचा

    sangli jilhyatil paryatan sthal ,सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे krantisinh nana patil anna bhau sathe This image has an empty alt attribute; its file name is youtube-thumbnail-1024x576.jpgvasantdada patil गणपती दादा लाड , G D Lad

    सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, देवस्थाने जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अशा अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजशी जोडले जा.
    धन्यवाद..!

    Follow On Instagram
    https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag

    Subscribe Our Youtube Channel
    https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd

    Check Official Website Of Thinksanglikar for all Sangli District Info ,Blogs
    https://thinksanglikar.in/

    Follow On Facebook Profile
    https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL

    Follow On facebook Page
    https://www.facebook.com/thinksanglikar

    Whatsapp number
    9145525222

    You cannot copy content of this page