पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
सह्याद्रीच्या पोटात काय-काय दडलं आहे हे एक अजब रहस्यच आहे
याचा एक नमुना म्हणजे दंडोबाचा डोंगर
कुठे आहे दंडोबा ?
तर हे तूम्ही पाहिलेलं हिलस्टेशन सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दंडोबाच्या डोंगरावर आहे. तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेला
दंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण आहे
डोंगरावरील मंदिर-
पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर पुरातन दंडनाथाचं मंदिर असून; सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे
डोंगराचे सौंदर्य वाढवणारे शिखर-
डोंगरमाथ्यावरचे शिखर आश्चर्यकारक आहे. इथले पुजारी आणि देवस्थानच्या मते हे शिखर मंदिराचं आहे. याची रचना पहिली तर हे लक्षात येतं, की त्याचा उपयोग वॉच टॉवर म्हणूनही करता यावा
डोंगरावरील उंच शिखर-
हे शिखर पाच माजली असून; सर्वांत वरचा भाग आहे तिथं चार ते पाच माणसं उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढं वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तिथं एक दगड आहे ज्याचा उपयोग करून वरती जाता येतं
विजापूरच्या गोल-घुमटाचं शिखर दिसतं
वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतोढग स्वच्छ असतील वातावरण चांगलं असेल तर इथं उभं राहिल्यावर
विजापूरच्या गोल-घुमटाचं शिखर दिसतं, असं इथले ग्रामस्थ सांगतात
You cannot copy content of this page