पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
सांगली (Sangli) जिल्ह्यातील बँगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील असून गावावर शोककळा पसरली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने इप्पाळगोळ हे कुटुंब आपल्या गावकडे येत होते. त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुली दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) यांचे देखील निधन झाले आहे. चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते, या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 3 महिन्यांपूर्वीच घेतलेल्या कारमध्ये इग्गाप्पागोळ यांनी कार खरेदी केली. KA 01 ND 1536 व्होल्वो कारने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला.
इगाप्पागोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, देवस्थाने जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अशा अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजशी जोडले जा.
Follow On Instagram
https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag
Subscribe Our Youtube Channel
https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd
Check Official Website Of Thinksanglikar for all Sangli District Info ,Blogs
https://thinksanglikar.in/
Follow On Facebook Profile
https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL
Follow On facebook Page
https://www.facebook.com/thinksanglikar
Whatsapp number
9145525222
You cannot copy content of this page