पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
ऐतिहासिक शिवकालीन बारव
ऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव म्हणून कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावाची ओळख आहे. येथील ऐतिहासिक शिवकालीन बारव या गावच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. ही ऐतिहासिक ‘बारव’ गावामधील महत्वाचा ऐतिहासिक वारसा असून कलात्मक स्थापत्याचा आदर्श नमूना आहे. या बारवेची भव्यता व देखणेपणं नजरेत भरते यामुळे ही बारव सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे
नेवरी गावालगत दक्षिण दिशेला पुरातन बारव आहे. ही पुरातन बारव आणि तिची रचना पाहिली की या गावचं गतवैभव डोळ्यात भरतं. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार ही बारव व्यंकोजीराजे यांनी बांधली असे समजते. मात्र रचना पाहून ही बारव पुरातन काळातील असावी असेही काही लोक सांगतात
अजूनही वाडा संस्कृतीची घरे
येथे सुरेराव व भालेराव या महाडीक बंधूच्या शौर्याचा इतिहासही लोक अभिमानाने सांगतात. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई हरजीराजे महाडीक यांचे बंधू व्यंकोजीराजे महाडीक यांचा ऐतिहासीक वारसा या गावाला लाभला आहे अशी माहिती मिळते. येथे अजूनही वाडा संस्कृतीची घरे पाहायला मिळतात. येथील मोठ-मोठे वाडे, भक्कम तटबंदी, डौलाने उभी असणारी वेस, मंदीरे ह्या सर्व गोष्टी या प्राचीन तसेच ऐतिहासिक काळाची साक्ष देतात
भद्रा प्रकारची बारव
येथील प्रमुख आकर्षण असलेली बारव साधारण चौरसाकार असून या मध्ये उतरायला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूने पाय-या बांधल्या आहेत. भद्रा प्रकारची ही बारव असून या बारवेच्या भिंतीमध्ये चारही दिशेला एकंदरीत मंदीरवजा १२ देवकोष्टके (देवळ्या) आहेत. यात देवी देवतांच्या मूर्ती होत्या. या मूर्ती सद्यस्थितीत दिसत नाहीत. वरील बाजूस पाणी खेचण्यासाठी मोट बसविण्यासाठी दगडी बांधकाम असून पाणी वाहूनहौदात सोडण्यासाठी दगडी पन्हाळी बांधण्यात आल्या आहेत
महादेवाच्या पिंडीवर सोनेरी किरणांचा अभिषेक
येथे सुरेराव व भालेराव या महाडीक बंधूच्या शौर्याचा इतिहासही लोक अभिमानाने सांगतात. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई हरजीराजे महाडीक यांचे बंधू व्यंकोजीराजे महाडीक यांचा ऐतिहासीक वारसा या गावाला लाभला आहे अशी माहिती मिळते. येथे अजूनही वाडा संस्कृतीची घरे पाहायला मिळतात. येथील मोठ-मोठे वाडे, भक्कम तटबंदी, डौलाने उभी असणारी वेस, मंदीरे ह्या सर्व गोष्टी या प्राचीन तसेच ऐतिहासिक काळाची साक्ष देतात
You cannot copy content of this page