पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
सांगलीतील काळया खणीचा इतिहास माहिती आहे का ?
काळी खण ही दोनशे वर्षांपूर्वीचा पाण्याचा जुना स्त्रोत्र आहे. इसवी सन १७९९ च्या सुमाराला सांगली आणि मिरज संस्थांच्या दोन वाटण्या झाल्या. त्यावेळी सांगली हे थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे आले. त्यांनी हे शहर संस्थानिक राजधानी करण्याचे निश्चित करून ते सुनियोजित पद्धतीने वसवण्याचे ठरवले
राजधानीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय इमारती, नागरिकासाठी घरे, गणेश दुर्ग, किल्ला नदीकाठावरील गणेश मंदिर, यासाठी मोठ्या प्रमाणात दगडाचे आवश्यकता होती आणि हा दगडाचा पुरवठा सांगली गावाजवळच मिळेल का ? याचा शोध चिंतामणराव यांनी घेतला
या वेळी सांगलीच्या पूर्व बाजूला असलेल्या सध्या काळी खण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागांमधील जमिनीच्या भूगर्भातील कठीण असा काळा दगड त्यांना आढळून आला. त्यामुळे नवीन राजधानीसाठी लागणाऱ्या बांधकामासाठी दगडाची गरज गावाजवळच पूर्ण झाल्याने त्यांनी याठिकाणी खण तयार केली. त्यातून मोठ्या प्रमाणात काळा दगड बाहेर काढण्यात आले. त्या दगडातून सांगली शहराच्या तत्कालीन अनेक इमारती घरे, उभी राहिलीमोठ्या संख्येने खाणकाम केल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. त्यात पाणी साठल्याने याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे राजधानीसाठी लागणाऱ्या सर्व इमारतीची गरज पूर्ण झाल्यावर ही खण तशीच पडून राहिली. त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिले, तसेच भुगर्भातूनही पाण्याचे झरे मिळत गेले. त्यामुळे या जागेला तळ्याचे स्वरूप आले. काळ्या दगडाची खण म्हणून ती काळी खण या नावाने ओळखली जाऊ लागली
गणेश मंदिर, गणेश दुर्गच्या तटबंदीसाठी याच खणीतून आणला दगड
विशेष म्हणजे गणेश दुर्ग या मोठ्या भुईकोट किल्ल्याच्या दगडी तटबंदीसाठी त्यांनी याच काळया खणीच्या दगडाचा वापर केला
सांगलीतील गणेश मंदिरासाठी काही दगड जोतिबा डोंगरावरून मागवण्यात आले होते मात्र अन्य कामासाठी लागणारा दगड याच खणीतून आणला होता
Also you can search – Sanglichi Kali Khan, sanglichi khan, सांगलीतील काळी खण
You cannot copy content of this page