पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
सांगली जिल्ह्यातील दिघंची (आटपाडी) गावचे विक्रम भोसले यांनी पुण्यात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी 2011 ते 2016 या कालावधीत टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअर म्हणून काम केले.
या नोकरीनंतर स्वतःची कार घेण्याचा विक्रम यांचा विचार पक्का झाला. मात्र, कार खरेदीसाठी लागणाऱ्या लोन आणि ईएमआयच्या ओझ्यामुळे त्यांनी एका मित्राच्या सल्ल्यानुसार टुरिस्ट गाडी विकत घेतली. सुरुवातीला विक्रम यांनी ही गाडी शनिवार-रविवार स्वतः चालवून भाड्याने दिली. इतर दिवशी ड्रायव्हरच्या मदतीने गाडी भाड्याने दिली जाई.
यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आणि व्यवसायाच्या संधी लक्षात घेऊन विक्रम यांनी आणखी काही टुरिस्ट गाड्या विकत घेतल्या आणि ओला-उबरसारख्या कंपन्यांची वेंडरशिप घेतली. 2016 साली त्यांनी पूर्णवेळ टुरिस्ट कार बिझनेस करण्यासाठी नोकरी सोडून VRB Technologies Pvt. Ltd नावाची कंपनी स्थापन केली.
त्यानंतर विक्रम यांनी कॉर्पोरेट सेक्टरमध्येही प्रवेश केला. Amdocs, Eaton, Ecolab, Expleo, Wipro यांसारख्या मोठ्या कंपन्यांसाठी एम्प्लॉयी ट्रान्सपोर्टेशन सेवा पुरवण्यास सुरुवात केली.
आज VRB कंपनीकडे पुणे, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद आणि दिल्ली येथे 500 हून अधिक कॅब्स आहेत. त्यातील 50 कॅब्स या कंपनीच्या स्वतःच्या आहेत. मागील वर्षी VRB चा टर्नओव्हर 22 कोटी रुपये होता, तर यावर्षी तो 25 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. एक कॅबपासून सुरू झालेली VRB कंपनी आज 60 कोटी रुपयांच्या नेटवर्थवर पोहोचली आहे.
सुरुवातीचा काळ कठीण : विक्रम भोसले
विक्रम भोसले सांगतात, आई, वडील शेतकरी आहेत. घरात कोणीही व्यसनाधीन नाही. पहिल्यापासून अनेक संकटांचा सामना केल्याने गरीबीची जाण होती. पहिल्यापासून अत्यंत हलाकीची परिस्थिती होती. कुटुंबावर वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्यामुळे तसेच घरातील सर्व मंडळींनी मला पूर्णपणे सहकार्य केल्याने मी आज व्यवसायात यशस्वी झालो आहे. सुरुवातीचा काळ थोडा अडचणीचा होता परंतु सध्या अनेक राज्यात कंपनीचे काम जोरात, असंही विक्रम भोसले म्हणाले.
सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, देवस्थाने जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अशा अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजशी जोडले जा.
Follow On Instagram
https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag
Subscribe Our Youtube Channel
https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd
Check Official Website Of Thinksanglikar for all Sangli District Info ,Blogs
https://thinksanglikar.in/
Follow On Facebook Profile
https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL
Follow On facebook Page
https://www.facebook.com/thinksanglikar
Whatsapp number
9145525222
अधिक वाचा
You cannot copy content of this page