पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा सोहळा विजयादशमीला (दसरा) पार पडतो. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात.
विजयादशमीनिमित्त होणारा पालखी शर्यंत सोहळा मूळस्थान व विट्यातील श्री रेवणसिद्ध देवाच्या पालख्यांत होत असतो. शर्यतीचे वैशिष्ट्य म्हणाजे दोन्ही पालख्या एकाच देवाच्या म्हणजेच श्री रेवणसिद्धाच्या असतात, पालखी पळवणारे शर्यत जिंकतात किंवा हरतात; मात्र देव कधी हरत नसतो. मूळ स्थान व विटा येथील दोन्ही पालख्यांची सायंकाळी पाचच्या सुमारास मारुती व विठ्ठल मंदिरासमोर आरती केली जाते. काळेश्वर मंदिरासमोर दोन्ही पालख्या येतात. पाहुणी असल्याने मूळ स्थानच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा मान असतो.
दोन्ही पालख्यांची काळेश्वर मंदिरासमोर आरती झाल्यानंतर शर्यंत सोहळ्यास सुरुवात होते. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. आरती झाल्यानंतर विट्याची पालखी पळवण्यासाठी डाव्या बाजूला विटेकर तर मूळ स्थानची पालखी पळवण्यासाठी उजव्या बाजूला सुळेवाडीकर (रेवानगरकर) सज्ज असतात. या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह देशातून लाखो भाविक उपस्थित राहतात, विट्याची पालखी पळवण्याचा मान शितोळे, गायकवाड, कदम, पाटील व सपकाळ घराण्यांकडे आहे. घराण्यांबरोबर शहरातील युवक, वृद्ध पालखी पळवण्यासाठी पुढे असतात, जी पालखी सर्वप्रथम शिलंगण मैदानात पोचते ती विजयी होते. पूर्वीपासून चालत आलेली ऐतिहासिक पालखी शर्यंत सोहळ्याची परंपरा शहरवासीयांनी अखंडपणे जोपासली आहे. दौडशेहून अधिक वर्षापासून मोठा भक्तिभाव व जातीय सलोखा राखून पालखी शर्यत सोहळा उत्साहात पार पडतो.
शर्यत झाल्यानंतर भावीक “श्री नाथबाबांच्या नावानं चांगभलं.. , श्री रेवणसिद्ध देवाच्या नावानं चांगभलं.. चा गजर करीत भाविक जल्लोष करतात . त्यानंतर रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात येते एकमेकांना आपट्याची वाटली जातात . असा नेत्रदीपक पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक प्रत्येक हजेरी लावतात . विजयादशमीचा हा सोहळा सांगली बरोबरच संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे .
सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल वर इन्स्टा पेजला फॉलो करा
Follow On Instagram
https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag
Subscribe Our Youtube Channel
https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd
Check Official Website Of Thinksanglikar for all sangli district info , blogs
https://thinksanglikar.in/
Follow On Facebook Profile
https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL
Follow On facebook Page
https://www.facebook.com/thinksanglikar
Whatsapp number
9145525222
You cannot copy content of this page