आचारसंहिता म्हणजे काय?

what is a code of conduct? | आचारसंहिता म्हणजे काय ?

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. पण आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?

आचारसंहिता म्हणजे काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारतात निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुका कोणत्याही पक्षपाताशिवाय होण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. निष्पक्षपातीपणे निवडणूक होण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासह, राजकीय पक्षांनाही काही नियम पाळावे लागतात. हेच नियम म्हणजे आचारसंहिता असते.

आचरसंहितेमध्ये कशावर बंदी?

निवडणूक आयोग पक्ष आणि उमदेवारांवर लक्ष ठेवून असते. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचं कोणीही पक्ष किंवा उमेदवाराने उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्याला निवडणूक लढण्यासाठीही बंदी घालण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असतो. आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांचं वर्तन, निवडणूक सभा, रॅली, मिरवणुका आणि रोड शो, मतदानाच्या दिवशी पक्ष आणि उमेदवारांचं आचरण, मतदान केंद्राची शिस्त, निरीक्षक आणि सत्ताधारी पक्षाची भूमिका यांचा उल्लेख आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम :

  • सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
  • सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे
  • कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
  • कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
  • जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.
  • कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानही घेणं आवश्यक आहे. विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही.
  • मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
  • मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते.
  • मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत. प्रचारसाहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये. मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.
  • निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार ‘भ्रष्ट आचरण’ आणि अपराध/गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी करता कामा नये.
  • मतदारांना पैसे देणं, मतदारांना धमकी देऊन घाबरवणं, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं, प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या-येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे.

राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात.

जात-धर्माच्या नावावर मतं मागू शकत नाही :

आचारसंहिता लागल्यानंतर कोणत्याही सरकारी घोषणा, इतर योजनांच्या घोषणा, वास्तूचं भूमिपूजन, पायाभरणी, योजनांचं लोकार्प असे कार्यक्रम करता येत नाहीत. सरकारी गाडी, सरकारी विमान आणि सरकारी बंगल्यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही. परवानगीशिवाय कोणाच्याही जमिनीवर, घरावर, परिसरात किंवा भीतींवर पक्षांचे झेंडे, बॅनर लावता येत नाहीत. कोणताही राजकीय पक्ष जात किंवा धर्माच्या आधारावर मतदारांकडून मतं मागू शकत नाही. तसंच धर्म किंवा जातीच्या आधारे तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू शकत नाही. तसंच मतदान केंद्राजवळ कोणत्याही नेत्याची, राजकीय पक्षाची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. तसंच मतदान बूथवरुन प्रचाराचं साहित्य, खाण्या-पिण्याच्या गोष्टी असू नयेत.
मतदानाच्या दिवशी मद्याची दुकानं बंद असतात. मतदारांना पैसे किंवा दारू किंवा इतर कोणत्याही वस्तूंचं वाटप करण्यास बंदी असते. निवडणूक आयोग राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करतो. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही.

सांगलीकर तुम्हाला माहित आहेत का 1952 ते 2024 पर्यंतचे सांगली जिल्ह्याचे सर्व खासदार ? त्या वेळचे पंतप्रधान आणि कोणाचे सरकार होते ?

This image has an empty alt attribute; its file name is youtube-thumbnail-1024x576.jpg

सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे :

सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल वर इन्स्टा पेजला फॉलो करा.
Follow On Instagram
https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag

Subscribe Our Youtube Channel
https://youtube.com/@thinksanglikar?si=gdB-kXueFziwaEUd

Check Official Website Of Thinksanglikar for all sangli district info , blogs
https://thinksanglikar.in/

Follow On Facebook Profile
https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL

Follow On facebook Page
https://www.facebook.com/thinksanglikar

Whatsapp number
9145525222

You cannot copy content of this page